२८ वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकत्र

‘केबीसी १८’मध्ये रंगणार खास भेट

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
मुंबई
amitabh bachchan and madhuri dixit बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांची जोडी तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एका गाण्यात दोघेही एकत्र झळकले होते. त्यानंतर मात्र अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्र काम केलेले नाही. आता ‘कौन बनेगा करोडपती १८’च्या मंचावर ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
 

amitabh bachchan and madhuri dixit 
माधुरी दीक्षित ‘मराठी कौन होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती १८’मध्ये विशेष पाहुणी म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची पुन्हा एकदा स्क्रीनवर भेट घडणार असल्याने या भागाची विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
यापूर्वीही माधुरी दीक्षित ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर दिसली आहे. २००१ मध्ये ती या कार्यक्रमात पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिने ५० amitabh bachchan and madhuri dixit  लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर २०१० मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या चौथ्या पर्वातही माधुरीने हजेरी लावली होती. आता या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १८व्या पर्वात ती तिसऱ्यांदा सहभागी होणार आहे.अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांची २८ वर्षांनंतर होणारी ही भेट प्रेक्षकांसाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. त्यातच ‘मराठी कौन होणार करोडपती’च्या प्रमोशनसाठी माधुरीची उपस्थिती असल्याने या विशेष भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि कार्यक्रमाच्या टीआरपीमध्येही वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.