शौचालयातील तीव्र रासायनिक वासाने दोन तरुणांचा मृत्यू; नेमका वायू कोणता?

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
मुंबई
chemical gas kills मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळील पूर्व परिसरातील सार्वजनिक शौचालयात आलेल्या तीव्र रासायनिक दुर्गंधीमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाकर धनावडे (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी मृतांची नावे आहेत. शौचालयातून नेमका कोणता रासायनिक वायू बाहेर पडत होता आणि त्याचा स्रोत काय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अग्निशामक दल, पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे.
 

chemical gas kills two youths near mrinaltai gore flyover, mumbai 
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रभाकर धनावडे आणि भाविन देसाई हे पारशी पंचायत गेटसमोरील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी शौचालय परिसरात अत्यंत तीव्र दुर्गंधी जाणवत होती. स्थानिक नागरिकांनीही यापूर्वी या दुर्गंधीबाबत तक्रारी केल्याची माहिती आहे. मात्र, या तक्रारींकडे वेळीच लक्ष गेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, शौचालयात गेल्यानंतर दोन्ही तरुणांना तीव्र रासायनिक वासाचा त्रास झाला आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही. अखेर मध्यरात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित परिसर सील करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हवा तसेच ड्रेनेजमधील नमुने घेण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण आणि शौचालयातील रासायनिक वासाचा स्रोत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळील पारशी गेटसमोरील परिसरात विविध छोटे-मोठे कारखाने आणि वर्कशॉप्स असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आस्थापनांमधून निघणारे रासायनिक द्रव किंवा सांडपाणी बेकायदेशीररीत्या गटार अथवा ड्रेनेजमध्ये सोडण्यात आले असावे का, या दिशेनेही तपास केला जात आहे. बंद ड्रेनेजमध्ये रासायनिक कचरा साचल्याने त्यातून अत्यंत विषारी हायड्रोजन सल्फाइड किंवा अन्य विषारी वायू निर्माण झाला असण्याचा प्राथमिक संशय पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका कोणता वायू आणि कोणत्या स्रोतामुळे हा प्रकार घडला, हे नमुन्यांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक शौचालय chemical gas kills परिसरात आधीपासूनच तीव्र दुर्गंधी जाणवत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली असती तर हा प्रकार टाळता आला असता का, याचाही तपास यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. सध्या परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, रासायनिक वायूचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे.