भाेपाळ,
cm mohan yadavमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी अब्दुल शेखला मुंबईमधून अटक केली आहे. आरोपी हा मूळचा बुरहानपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनुसार, आरोपीने डायल-११२ वरून मुख्यमंत्र्यांना धमकीचे संदेश पाठवले होते. मेसेज पाठवल्यानंतर आरोपीने ते डिलीटही केले होते. त्याने दोनदा धमकीचा संदेश केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली़ पोलिस त्याच्या मोबाईलची तपासणी करत असून धमकी देण्यामागे त्याचा हेतू काय होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आराेपी अब्दुल केटरिंगचे काम करतो. याआधीही त्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेच धमकीचे मेसेज पाठवले असल्याचे चाैकशीत समाेर आले आहे.