भामरागडच्या पूरस्थितीत लॉयड्सकडून तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्ट

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
गडचिरोली,
Gadchiroli Newsभामरागड परिसरातील पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्ट केले. २७ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागातून या रुग्णांना हवाई मार्गाने बाहेर काढून हेदरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

bhamra 
 
यामध्ये अपेक्षा रुशी आलम. रोशन चिन्ना मडावी (२१) आणि सात वर्षीय संगीता चुक्कू उसेंडी यांचा समावेश आहे. तिन्ही रुग्णांना सिकलसेलसह विविध गंभीर आजारांचा त्रास असून संगीता हिला सेरेब्रल मलेरियामुळे अतिदक्षता उपचारांची गरज होती. सध्या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी छातीत दुखत असल्याने सुखदेव उगले (४२) यांनाही भामरागडहून आपत्कालीन एअरलिफ्ट करण्यात आले होते. लॉयड्सकडून पूरग्रस्त नागरिकांसाठी वैद्यकीय पथके, औषधे व मेडिकल कंज्यूमेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांना फळे, अल्पोपहार व ओआरएसचे वाटप करण्यात आले आहे. लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य सुरू आहे.