शेतकऱ्यांसाठी धावुन आले श्री संत गजानन महाराज

मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखांचा सहयोग निधी सुपूर्द

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री गजानन महाराज संस्थानचा मदतीचा हात
शेगाव,
gajanan maharaj sansthan महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा सहयोग निधी दिला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत संस्थानतर्फे हा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला.
 
 
gajanan maharaj sansthan
 
 
यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची कमतरता जाणवली असून राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मदत मिळावी, यासाठी विविध स्तरांतून मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्याच अनुषंगाने श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.
२७ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थानतर्फे हा सहयोग निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृतपणे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला.gajanan maharaj sansthan दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संस्थानने दिलेल्या या योगदानामुळे शासनाच्या मदतकार्याला बळ मिळणार असून बाधित शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्या या योगदानातून सामाजिक बांधिलकी आणि आपत्तीच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याची भूमिका अधोरेखित झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी या निधीचा हातभार लागणार आहे.