डॉल्बीच्या आवाजाने युवकाचा मृत्यू?

हिंगोलीत विसर्जन मिरवणुकीला गालबोट

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
औंढा नागनाथ, 
hingoli ganeshotsav मानाच्या १२ गणेशमूर्तींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून थाटात निघाली. पोलिसांचा चोख बंदोबस्त, सर्वत्र उत्साह आणि आनंदी वातावरण असताना एका युवकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे मिरवणुकीला गालबोट लागले. डीजेवर बंदी असतानाही खेड्यापाड्यात मात्र विसर्जन मिरवणुकीत धडाक्याने डीजेचा कर्णकर्कश आवाज घुमला.

dolby
 
परभणीतून हिंगोलीत व्यापारासाठी आलेल्या नागेश वाघमारे हा २१ वर्षीय तरुण मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर एका बाजूला उभा होता. लेझर लाईट्स, कर्कश आवाजातील डाॅल्बी याचा संमिश्र परिणाम होऊन, नागेश रस्त्यावरच चक्कर येऊन पडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ते निश्चित होणार आहे. मात्र, प्राथमिक दृष्टीने डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने युवकाचा जीव गेला असण्याची शक्यता आहे.
 
औंढा पोलिस स्थानकामध्ये एकूण १० ते १२ डॉल्बीवादक आणि वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनांसह डॉल्बी उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. याआधी, वर्ष २०१० च्या श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये मुस्लिम धार्मिक स्थळाजवळ गुलाल व रंग फेकण्यावरून दगडफेक झाल्यामुळे उत्सवाला गालबोट लागले होते. त्यानंतर, तब्बल १६ वर्षांनी आता युवकाच्या संशयास्पद मृत्यूमुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.