५२ प्रकरणांत ठोठावला १७.९९ कोटींचा दंड

गौण खनिज; अवैध उत्खनन-वाहतूक प्रकरणी ३१ गुन्हे

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
वर्धा, 
illegal-sand-miningजिल्ह्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीची ५२ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांत संबंधितांवर १७ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी ६७ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान ३१ प्रकरणांत गुन्हे दाखल करून २० जणांना अटक करण्यात आली आहे.
 
sand
 
जिल्ह्यातील विविध भागांत गौण खनिजांचे अवैध उत्खनन तसेच विनापरवाना वाहतूक होत असल्याच्या पृष्ठभूमीवर महसूल प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवैधरित्या खनिज वाहतूक करणारी ४९ वाहने जप्त करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या ५२ प्रकरणांमध्ये सर्वाधिक ४० प्रकरणे वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीशी संबंधित आहे. त्यापाठोपाठ मुरूमच्या अवैध उत्खनन व वाहतुकीची ११ प्रकरणे नोंदविण्यात आली आहे.
 
दगडाच्या अवैध उत्खननाचे एक प्रकरण असून या प्रकरणांमध्ये दंडाची मोठी रक्कम निश्चित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ६७ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. उर्वरित दंडाची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.