भारतीय तत्त्वज्ञान परंपरा एकात्मभावावर आधारित : पद्मश्री प्रभुणे

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
वर्धा,
padma shri prabhune भारतातील विविध तत्त्वज्ञान परंपरा मूलतः एकात्मभावावर आधारित आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गालिब सभागृहात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय : एकात्म मानववाद, अंत्योदय आणि राष्ट्रनिर्माण, या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. कुमुद शर्मा, विशेष अतिथी म्हणून प्रा. सुभाष लोहे, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 
 
 
padma shri prabhune
 
 
वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा उल्लेख करीत पद्मश्री प्रभुणे यांनी, भारतीय तत्त्वज्ञान संपूर्ण मानवजातीला एका कुटुंबाच्या रूपात पाहण्याची दृष्टी देते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदयाच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी समाजातील शेवटच्या व्यतीच्या कल्याणाला त्यांच्या चिंतनात विशेष महत्त्व दिले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. सुभाष लोहे म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनात धर्म ही भारताची आत्मा आहे आणि मानव निसर्गापासून वेगळा नाही. भारताचे तत्त्वज्ञान हे एकात्म तत्त्वज्ञान असून त्यामध्ये मानव, निसर्ग आणि समाज यांना परस्परांशी जोडलेले मानले जाते. आपण भूमीला मातेसमान मानून तिचे वंदन करतो. याच भावनेतून भारतात राष्ट्रनिष्ठा आणि देशभावना दृढपणे विकसित झाली आहे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा म्हणाल्या की, एकात्म मानववाद हा अंतिम व्यती आणि मानवतेची स्थापना करणारा विचार आहे, तर अंत्योदय प्रत्येक व्यतीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देतो. हीच भावना भारतीय संविधानातही अंतर्भूत असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात जनसंचार विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मीडिया समय’ या प्रायोगिक वृत्तपत्राच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.padma shri prabhune तसेच ‘वर्धा दर्शन’ या प्रायोगिक दूरदर्शन वृत्तबुलेटिनचे प्रसारणही करण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रा. अवधेश कुमार, प्रा. जनार्दन कुमार तिवारी, डॉ. एच. ए. हुनगुंद, डॉ. रामानुज अस्थाना, डॉ. शैलेश कदम, डॉ. सूर्यप्रकाश पांडेय, डॉ. बालाजी चिरडे, डॉ. अशोकनाथ त्रिपाठी, डॉ. रूपेश कुमार, डॉ. श्रीनिकेत कुमार मिश्र, डॉ. शिवसिंह बघेल, डॉ. कोमलकुमार परदेशी, डॉ. जगदीश नारायण तिवारी, आदी उपस्थित होते.