बस तिकीट दरात सूट हवी असेल तर जाणून घ्या 'हा' नवा नियम

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
मुंबई,
MSRTCमहिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवर्गांतील प्रवाशांना एसटी प्रवासात शासकीय सवलती आता स्मार्ट कार्डद्वारेच मिळणार आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सुमारे २ लाख प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहे. यापूर्वी १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
 
buss
एसटी महामंडळाने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले होते. मात्र, सुरुवातीच्या काळात स्मार्ट कार्डच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. कार्ड काढणे, रिचार्ज आणि ॲक्टिव्हेशन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने प्रवाशांनी गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी कायम असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.
 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील ३०७ एसटी बस कोकणात पाठवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवाचा कालावधी संपल्यानंतर या बस आता विभागात परतल्या आहेत. त्यामुळे नियमित मार्गांवरील वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.