सामूहिक वंदे मातरम् गायन

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Namami Bharatam पंडित बच्छराज व्यास विद्यालय इंग्रजी माध्यम येथे विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानतर्फे ‘नमामि भारतम्’ अंतर्गत सामूहिक वंदे मातरम् गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून तसेच दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून नागेश टेंभेकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर व पर्यवेक्षिका रचना पत्की उपस्थित होत्या.
 
joshi
 
वंदे मातरम् हे देशाचा अलंकार असून, या गीतातून भारताची विविध संस्कृती व परंपरांचे दर्शन घडते, असे नागेश टेंभेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवश्री बनकर यांनी केले. रोहिणी पंचभाई यांनी आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सौजन्य: रोहिणी जोशी,संपर्क मित्र