ओरीच्या लग्नाची जयपूरमध्ये चर्चा

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि मॉडेल्सची मोठी गर्दी

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
मुंबई
orry wedding सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवतरामानी अर्थात ‘ओरी’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ओरी जयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्याच्या कथित लग्नाची निमंत्रण पत्रिका असल्याचे सांगितले जाणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, ओरीनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाच्या आमंत्रणाचा व्हिडीओ शेअर केल्याचे सांगितले जात आहे.
 

orry wedding in jaipur: orhan awatramani wedding invitation goes viral 
ओरीच्या कथित लग्नासाठी जयपूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरमधील कुकास येथील फेअरमाँट हॉटेलमध्ये २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रण पत्रिकेतून समोर येत आहे. मोठ्या सामाजिक कार्यक्रमांसह विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमांसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण सोहळ्याला खास नावही देण्यात आले असून, त्याची मांडणी एखाद्या भव्य उत्सवासारखी करण्यात आल्याचे दिसून येते.ओरीच्या कथित ‘वेडिंग वीकेंड’साठी देशभरातील अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि मॉडेल्स जयपूरमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारपासून जयपूर विमानतळावरही याची लगबग पाहायला मिळाली. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी टीमच्या सदस्यांकडे ‘ओरीचे पाहुणे’ असे लिहिलेले फलक असल्याचेही समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, २६ आणि २७ सप्टेंबरला ‘वेडिंग वीकेंड’ म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही निमंत्रण पत्रिका पारंपरिक लग्नपत्रिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आली असून, पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या आमंत्रणासोबत चॉकलेटचा बॉक्सही असल्याचे सांगितले जात आहे.या दोन दिवसांतील प्रत्येक कार्यक्रमाला स्वतंत्र नाव देण्यात आले आहे. २६ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता ‘मेहफिल-ए-सुफियाना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रिकेत नमूद आहे. संगीत आणि थेट सादरीकरणाने सजलेली ही विशेष संध्याकाळ असल्याचे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. हा संपूर्ण सोहळ्यातील पहिला मोठा कार्यक्रम ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, व्हायरल orry wedding  झालेल्या निमंत्रण पत्रिकेच्या डिझाइनचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पत्रिकेवरील चित्रे आणि सजावटीवरून या कथित विवाहसोहळ्याची थीम राजस्थानशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ओरीच्या लग्नाबाबत समोर येणाऱ्या विविध दाव्यांवर अद्याप अधिकृतपणे कितपत शिक्कामोर्तब झाले आहे, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर या कथित विवाहसोहळ्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.