१०८ रुग्णवाहिका सेवा ठरली रुग्णांसाठी वरदान

२३ रुग्णवाहिकांद्वारे २४ तास सेवा

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
पुणे,
pune-108-ambulance-ganeshotsavगणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांना तातडीची आणि प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून पुणे शहर व पुणे जिल्ह्यात विशेष नियोजन करण्यात आले होते.
 
108
गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात एकूण १८ रुग्णवाहिका, तर पुणे जिल्ह्यातील पाच अष्टविनायक क्षेत्रे थेऊर, मोरगाव, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका अशा एकूण २३ रुग्णवाहिका २४ तास तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
 
या विशेष सेवेसाठी २६ डॉक्टर, २६ ड्रायव्हर्स तसेच ऑपरेशनल स्टाफ असा सुमारे ५७ ते ५८ जणांचा मनुष्यबळाचा ताफा कार्यरत होता. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात भाविकांना कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश होता.
 
१४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून तब्बल १७९८ रुग्णांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यापैकी १७ आपत्कालीन रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
 
या कालावधीत पाय घसरून पडणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डिहायड्रेशन, मद्यपानामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय समस्या, छातीत दुखणे तसेच कार्डियाक अरेस्ट यांसह विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये १०८ च्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाने तत्काळ सेवा दिली.