कारंजा (घा.)
Seva Sankalp Yatra in Wardha पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनेला बळ देण्याच्या उद्देशाने "सेवा संकल्प यात्रा" हे सुरू केलेले एक महत्त्वाचे राष्ट्रव्यापी अभियान आहे. पंतप्रधान मोदींचे जन्मस्थान असलेल्या वडनगर ते त्यांची कर्मभूमी व संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी पर्यंत विशेष सेवा संकल्प बाईक यात्रा काढण्यात आली आहे.जनसहभाग आणि सेवा कार्य: यात्रेदरम्यान तरुण सेवायात्री विविध गावे, शहरे आणि राज्यांमध्ये थांबून सामाजिक व सेवाभावी कार्य करत आहेत. कारंजा (घा) येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले.आजच्या या सेवा संकल्प यात्रेमध्ये सर्वप्रथम कारंजा नगरीचे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या मंदिरामध्ये पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. सुमित वानखडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अध्यक्ष संजय गाते, आ. संजय भेंडे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस ,कमलाकर निंभोरकर, पृथ्वीराज शिंदे, गुंडू कावळे ,श्रीधर देशमुख ,शिरीष भांगे,सुवर्णाताई चौधरी रोशन चौधरी हे होते.

आ. सुमित वानखडे यांनी सांगितले की,सेवेचा संकल्प घेणारी ही यात्रा आहे,आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत,म्हणजे नेमके काय...?आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारण करतो म्हणजे ते कशासाठी करतो तर ते आपल्या देशासाठी, समाजासाठी, लोकांच्या सेवेसाठी.राजकारणाच्या माध्यमातून आपण काय करतो तर सेवेचे संस्कार नरेंद्र मोदींनी इतके वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दिलेले आहेत.सतत २५ वर्ष कार्य करीत असताना एकही दिवस सुट्टी न घेता २४ तास वर्षभर नुसतं आपल्या देशाच्या जनतेचा विचार करून काम करत आहे मनामध्ये सेवेचा भाव असल्याशिवाय असं कर्तुत्व करून दाखविता येत नाही अशी सेवेची भावना आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचे संस्कार सर्व कार्यकर्त्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे.
या सेवा संकल्प यात्रेच्या दरम्यान अनेक सेवेचे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत वृक्षारोपण,आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,स्वच्छता अभियान व स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व सेवेचा संकल्प करावा असे आ. वानखडे यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्णाची महाडिक व आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली होती..या सेवा संकल्प यात्रेमध्ये "बाईक रॅली" सोबत जय मेहता व मेहुलजी उपस्थित होते. या "सेवा संकल्प यात्रा" कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरण प्रेमी विलास वानखेडे तसेच कारंजा शहरातील तीस सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा आर्वी विधानसभा ,कारंजा मंडळ यांनी केले होते. संचालन दिलीप जसुतकर तसेच आभार प्रदर्शन जगदीश डोळे यांनी केले.