प्रफुल्ल व्यास
वर्धा,
sudhir pangul राजकारणात पद मिळाले की वाढदिवस, नियुक्तीच्या शुभेच्छा वा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आगमानात स्वागत शुभेच्छांचे बॅनर, पोस्टर शहरात लावण्याची चढाओढ सर्वत्र पहायला मिळते. मात्र, वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी या प्रचलित परंपरेला छेद देत एक नवा पायंडा पाडला आहे. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही बॅनर किंवा पोस्टर लावू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिल्याने पोस्टर वा बॅनरशिवाय त्यांचा वाढदिवस झाला. भाजपाच्या महिला नगरसेवकांनी आघाडीतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाचे त्यांच्याच दालनात औक्षवन करून वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा वाढदिवस वर्धेच्या सौंदर्याचा संदेश देणाराच ठरला.

राजकारणात असताना काही गोष्टी अवघड असल्या तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा ठसा असलेल्या सुधीर पांगुळ यांनी नगराध्यक्षपदाची सुत्रं स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष कामालाच हात घातला. शहर स्वच्छतेचा विषय असो किंवा उन्हाच्या वाढत्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी वृक्षारोपणाची गरज असो, त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी होत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. वर्धेत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना वृक्षारोपण अभियानातही स्वतः आघाडी घेतली. त्यांच्या वृक्षारोपनाच्या चळवळीला वर्धेकरांनी उत्स्फुर्तपणे सहभाग दिला. त्यांच्या दालनात आलेल्यांना ते एक तरी झाड लावा असा संदेश देतात. वाढदिवसाच्या दिवशी फ्लेक्स, बॅनर न लावण्यासंदर्भात नगराध्यक्ष पांगुळ यांना विचारले असता आपल्याला हा प्रकार पूर्वीपासूनच आवडत नाही.sudhir pangul नगराध्यक्ष झाल्यानंतर शुभेच्छा बॅनरची संख्या वाढेल, हे अभिप्रेत असल्याने आपण आधीच जाहीर शुभेच्छा देऊ नका, असा संदेश दिला होता. आपल्यावर प्रेम करणार्यांनी तो संदेश परिपूर्ण पाळला. यातूनच शहर स्वच्छतेचाही एक नवा संदेश दिल्या गेला असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे पांगुळ यांनी सांगितले.