जीवनगौरव पुरस्कारामुळे सेवा क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल- श्री.प्रवीण कुठे

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
youth-for-sevaयुथ फाँर सेवा संस्थेमार्फत फुटपाथवरील ४३५ वंचित मुलांना शिक्षित करून समाज धारेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहे .यामुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत होते . शिक्षणाच्या दरम्यान युवक कौशल्य , बालकार्य विकास, आर्थिक साक्षरता , तांत्रिक कौशल्य मुलांना शिकविल्या जाते .चिखली अर्बन बँकेच्या वतीने सेवा कार्य करणाऱ्यांना प्रेरणादायी असा हा जीवनगौरव पुरस्कारामुळे सेवा क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन नागपूर येथील युथ फाँर सेवा संस्थेचे श्री.प्रवीण कुठे यांनी चिखली अर्बन बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये केले .
 
yuth
 
 
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि.चिखलीची ६५ वी आमसभा रविवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली. अहवाल वर्षातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीनां चिखली अर्बन बँकेचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते श्री.प्रवीण कुठे व सौ .आकांक्षा कुठे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
 
 
चिखली येथे संपन्न झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.डॉ आशुतोष गुप्ता होते. मंचावर श्री सतीश गुप्त , मा.डॉ.राजेंद्र शिंगणे (नवनिर्वाचित अध्यक्ष दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, बुलडाणा) मा.आ.सौ.श्वेताताई महाले पाटील मा.श्री.विद्याधर महाले (मा.मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव)तसेच बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा.श्री.अंकुशराव पडघान मा.श्री.गोविंद मापारी, मा.श्री.शिवचंद्र तायडे, मा.श्री.सुनील उदयकार, मा.सौ.पुष्पाताई बावरकर, नगराध्यक्ष मा.श्री.पंडितराव रामराव देशमुख,– चिखली मा.श्री.अनिल केंधळे- वाशीम मा.श्री.किशोर गारोळे- मेहकर ,बँकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक मा.श्री.आनंद जेठाणी मा.श्री.रामदास बिडकर सहाय्यक निबंधक मा.श्री.राजेंद्र घोंगे, विजय कोठारी, रामकृष्णदादा शेटे,प्रेमराज भाला व सर्व शाखांचे सल्लागार हे प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर विद्यानिकेतन कला अकादमी कडून राष्ट्रगीत व सहकार गीत सादर करण्यात आले. आम सभा सुरू झाल्यानंतर सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले .सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता म्हणाले की जागतिक पातळीवरील आर्थिक मंदी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेला ताण सर्वांना माहीत आहे.
 
 
या आव्हानात्मक परिस्थितीतही बँकेने समाधानकारक कामगिरी करीत आहे आजच्या काळात बँकिंग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. केवळ सहकारी बँकांमध्येच नव्हे, तर व्यावसायिक आणि खासगी बँकांसोबतही स्पर्धा करावी लागत आहे. अशा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी बँकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये उत्तम भागभांडवल, व्यवस्थापनात सुधारणा, सुरक्षित कर्जे देणे आणि कमी खर्चाच्या ठेवी आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे ठेवीदार,खातेदार ,कर्जदार आणि सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे .त्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे बँकेची घोडदौड आज वेगाने सुरू आहे.
 
 
या वेळी मा. आ. सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या बँकेचा अधिक गतीमान आणि पारदर्शक कारभार नवीन अध्यक्ष डॉ आशुतोष गुप्ता करतील . रा. स्व. संघाशी पाळेमुळे जुळलेली व संघाची शिकवण जोपासणारी संस्था असून या संस्थेशी आपण जोडलेलो आहोत . श्री राजेंद्रजी शिंगणे यांनी आपल्या मनोगतातून सहकार क्षेत्राच्या मजबूतीसाठी केंद्र सरकार सुध्दा योजना आखत आहे .माझ्या राजकारणाची सुरुवात ही सहकारातून झाली.सहकारावर अनेक लोक अवलंबून असल्यामुळे सहकार क्षेत्राचे कामास झोकून देऊन अधिक वेळ देऊन सहकारी संस्था टिकवल्या गेल्या पाहिजे श्री विद्याधर महाले यांनी बँकेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व बँकेच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले . यावेळी पंडितराव देशमुख यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांना व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
 
 
प्रास्ताविक मा.श्री.अभिजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन श्री रामदास बिडकर यांनी केले . याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री मनीष गुरुदासानी संचालक श्री सतीश गुप्त , श्री नरेंद्र लढ्ढा श्री शामसुंदर पारीख ,श्री पुसाराम मुंदडा ,श्री अनिल आवटी. श्री अमित जैन, श्री अभिजीत राजपूत, श्री अमोल खेकाळे, श्री पंकज इलग, डॉ पियुष पुरोहित, श्री अनिल सौदागर, सौ सुषमा शेटे. सौ शितल शेळके सरव्यवस्थापक श्री संदीप गजऋषी , श्री शशांक पंधाडे आदी उपस्थित होते . श्री सुजित दिवटे यांनी सूत्रसंचालन केले श्री राजेंद्र डांगे व चमूने सहकार गीत सादर केले. या वेळी बँकेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .