यंदा १६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन थेट बांधावर

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
वर्धा,
Marathi Farmers Literature Conference हिंगणघाट तालुयातील अ‍ॅग्रीसन एफपीएस परिसर, आर्वी छोटी शिवार येथे २५ ते २७ डिसेंबर दरम्यान १६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली आहे.
 

यंदा १६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन थेट बांधावर 
शेती अर्थशास्त्राला प्रतिबिंबित करणारे साहित्यिक निर्माण व्हावे, यासाठी शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. त्याच उपक्रम शृंखलेची एक कडी म्हणून ३ दिवस चालणार्‍या नियोजित साहित्य संमेलनात विविध विषयावरील चर्चासत्र, संवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन, गझल मुशायरा आदी कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध रितीने आयोजित केले जाणार आहेत.संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ शेती साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्यद्वय ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून माजी आमदार सरोज काशीकर, अ‍ॅड. वामन चटप उपस्थित राहतील. डॉ. अनिल जवादे स्वागताध्यक्ष आहेत. शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
 
 
आयोजनाकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून दिलीप भोयर (अमरावती), अ‍ॅड. सतीश बोरुळकर (मुंबई), उपेंद्र महात्मे (कळमेश्वर), जयंत बापट (यवतमाळ), रमेश खांडेभराड (जालना), सुनील बावणे (चंद्रपूर), राजेंद्र फंड (अहिल्यानगर), प्रवीण आडेकर भद्रावती), डॉ. मनीषा रिठे, मधुसूदन हरणे, प्रतिभा काळे, दिलीप देवतळे, गणेश मुटे, प्रकाश गोटे, आदींचा विविध समित्यांमध्ये समावेश आहे. सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.