नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन पलटले

एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
मूल, 
mul accident newsधाब्यावरून जेवन आटोपून घरी परत येत असतांना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर तिघे जण जखमी झाल्याची घटना रविवार, 27 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मूल शहरात घडली.
 

mull 
 
मूल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर मूलपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वळण मार्गावर स्कोडा क्रमांक एमएच-31-1857 चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन मार्गालगतच्या शेतात जावुन पडले. झालेल्या अपघातात मंगेश रोडे नामक युवकाचा मृत्यु झाला. तर वाहन चालक सावन बुटे, प्रणय शिरपुरे आणि राहुल आगबत्तनवार हे जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरीकांनी जखमींना वाहनामधून काढुन प्राथमिक उपचाराकरीता स्थानिक उपजिल्हा रूग्णालय येथे हलविले. त्यानंतर जखमींची परिस्थिती लक्षात घेवुन योग्य उपचाराकरीता चंद्रपूर येथे हलविले.
 
 
दरम्यान उपचाराकरीता नेत असतांनाच मंगेश रोडे यांचा मृत्यु झाला. रविवार असल्याने चौघेही मित्र नागपूर मार्गावरील एस. के. धाबा येथे जेवन करण्यास गेले होते. जेवन आटोपुन घरी परत येत असतांना रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामध्ये जखमी झालेले सावन बुटे आणि प्रणय शिरपुरे हे सनदी लेखापाल आहेत. तर राहुल आगबनवार यांचे स्थानिक गांधी चौकात इलाईट मोबाईल शॉपी आहे. सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.