अविनाश महालक्ष्मे यांना भगंवतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा हेमंत देसाई यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Award to Avinash Mahalakshme अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा "आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पु: रस्कार" ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा केली. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत उत्तुंग कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी पत्रकारांना गौरविण्यात येते. पत्रसृष्टीत परिषदेचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे समजले जातात. जीवनगौरव पुरस्कार यापुर्वी दिनू रणदिवे, मा.गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश बाळ जोशी, मधुकर भावे, रामभाऊ जोशी आदि मान्यवरांना दिला गेला आहे.
 
 

Award to Avinash Mahalakshme 
 
 
अन्य पुरस्कार असे- परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष आचार्य प्र.के.अत्रे पत्रकारिता पुरस्कार- प्रशांत कदम, हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांच्या नावे दिला जाणारा ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना जाहीर झाला आहे. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार : सचिन परब, नागोजीराव उर्फ आण्णासाहेब दुधगावकर स्मृती पुरस्कार : राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार : संतोष आंधळे, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार : सुनील पाटील, कोल्हापूर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार : महेश तिवारी, गडचिरोली, सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार : जान्हवी मुळे, दिल्ली, संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार- बापुसाहेब जाधव सातारा यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात मुंबईत होणाऱ्या एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.