लालखडी रोडवर गोवंश तस्करीचा पर्दाफाश

३२ जनावरांची सुटका, एक आरोपी ताब्यात, दोघे फरा

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
अमरावती
cattle-smuggling-racket- शहर गुन्हे शाखेने नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशांची सुटका करत आयशर ट्रकसह एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, दोन आरोपी फरार आहेत.
 
cattle
२८ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदे व गुन्हेगार तपासणीसाठी गस्तीवर असताना लालखडी रोडवरील टॉवर लाईन, बाबा पॅलेससमोरील मोकळ्या जागेत एक आयशर ट्रक उभा असून त्यात कत्तलीसाठी गोवंश डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता दोन इसम ट्रकमधून गोवंश खाली उतरवत असल्याचे आढळले. महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासणी केली असता गोवंशांना आखूड दोराने अमानुषपणे बांधून, चारापाणी न देता डांबून आणल्याचे निष्पन्न झाले. यातील ३ गोवंश मृत, तर ३२ जखमी अवस्थेत आढळले. एकूण २८ गायी व ७ गोरे असा ३५ गोवंशांचा समावेश आहे. जखमी ३२ जनावरांना देखभाल व संरक्षणासाठी गोरक्षण संस्थान, दस्तूरनगर येथे पाठविण्यात आले.
 
या कारवाईत ४.८८ लाख रुपयांचे गोवंश, १२ लाखांचा आयशर ट्रक व १२ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अब्दुल अजहर अब्दुल नझीर (३०, बिस्मिल्ला नगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले असून मोहम्मद मुसीर मोहम्मद शफी व ट्रक चालक राशीद (रा. नागपूर) हे फरार आहेत. कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.