नागपूर,
Chroma Electric Mall Ajani अजनी येथील क्रोमा इलेक्ट्रिक मॉलमध्ये विद्युत उपकरणांचा वापर करून श्री गणेशाच्या मूर्तीसारखी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यात इलेक्ट्रिक प्रेसचा हात व मोदकाच्या हातासाठी, तर व्हॅक्यूम क्लिनरचा चेहरा आणि पाईपचा सोंड म्हणून वापर करण्यात आला होता.
ही माहिती मिळाल्यानंतर हिंदू जनजागृती समिती व भारतीय युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये जाऊन संचालकांशी संवाद साधत श्री गणेशाची अवहेलना होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रतिकृती तातडीने हटवली.यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख राहुल पांडे, दिव्यांशू दुर्गे, वैशाली फुलझेले तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य:उमाकांत रानडे,संपर्क मित्र