इव्हीएमनंतर आता निवडणूक आयोगाची बदनामी

पालकमंत्री डॉ. भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
वर्धा, 
Election-Commissionविरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक हरले की इव्हीएमवर आरोप केले जात होते. आता थेट निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींचा फेक नेरिटिव्ह उघड झाला आहे. हाती संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी आता संविधानाने निर्माण केलेल्या संस्थेवरच प्रश्न उपस्थित करीत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 
ele
 
 
स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, नप उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, श्रीधर देशमुख, निलेश किटे, गिरीष कांबळे यांची उपस्थिती होती.
 
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, एसआयआर सह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले असून, आयोगात मतभेद असल्याचा दावा निराधार ठरला आहे. निवडणुकीत विजय मिळाला की आयोग योग्य आणि पराभव झाला की आयोगावर आरोप करणे ही दुटप्पी भूमिका आहे. संविधान हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबाबत जनतेत अविश्वास निर्माण करण्याऐवजी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे.
 
 
भारताचे संविधान, लोकशाही आणि संवैधानिक संस्थांवरील जनतेचा विश्वास कायम अबाधित राहील, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. फार्म ६ संदर्भातही अनावश्यक संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्वरूपातील फार्म वैध मान्य केला त्याच स्वरूपात त्याचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात एसआयआरचे काम व्यवस्थीत सुरू आहे. भाजपाने बीएलओ तयार करून एसआयआरची प्रक्रीया गांभीर्याने घेतले. विरोधकांनीही बीएलओच्या माध्यमातून मतदार यादी तपासण्याचे काम करावे. संविधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी उपलब्ध यंत्रणांचा वापर करून मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले