क्षुल्लक कारणावरुन पुतण्याने केली काकाची हत्या

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
वाशीम,
gawlipura-murder-caseशहरातील गवळीपुरा परिसरात कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. काका आणि पुतण्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्राथमिक माहितीनुसार, पुतण्याने आपल्या काकांवर कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात काका गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
 
 
murder
गवळीपुरा भागातील रहिवासी अशोक जाधव (वय ५५) यांचा त्यांचा भाचा रवी जाधव याच्यासोबत किरकोळ वाद झाला. सुरुवातीला दोघामध्ये वाद झाला, पण त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर रवी जाधव ने कुर्‍हाड उचलून अशोक जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण डॉटरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
 
घटनेची माहिती मिळताच, वाशीम शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा तयार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रवी जाधव गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपीचा शोध घेत आहेत. हत्येमागील हेतू, वादाचे नेमके कारण आणि हल्ल्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास सुरू आहे. या प्रकरणात वाशीम शहर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. एका किरकोळ वादाच्या या भीषण परिणामामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.