एआय तंत्रज्ञानाद्वारे जिल्हाधिकार्‍यांनी केली आरोग्य तपासणी

नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
बुलढाणा
health check-up using AI technology सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा तसेच आधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी उपलब्ध झालेल्या अख आधारित ‘डउअछज’ रोबोटिक मशीनद्वारे स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.
 
health ai
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास आल्यास त्यावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शय होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
 
एआय तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.