मुंबई,
lalbagcha raja mobile theftमुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी राज्यासह देशभरातून भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांसह चोरट्यांचीही मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ह्याच गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी अनेक भाविकांच्या खिशांमधून मोबाईल, गळ्यातून सोन्याची चैन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अनेक पोलीस चौकींमध्ये आतापर्यंत मोबाईल फोन चोरीच्या सुमारे 200 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांनी आतापर्यंत मोबाईल फोन हरवल्याच्या 192 प्रकरणांची अधिकृतपणे नोंद केली आहे.

याव्यतिरिक्त, पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाईल फोन आणि सोन्याची चैन चोरीसंबंधित 10 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांमुळे पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील गर्दीच्या भागांमध्ये सक्रिय असलेल्या संशयित टोळ्यांवर तात्काळ कारवाई सुरू केली आहे. लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल, सोन साखळी आणि मौल्यवान वस्तू गेल्या प्रकरणी आतापर्यंत एका अल्पवयीन मुलासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांच्या मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांचा, तरूणांचा आणि महिलांचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. गर्दीत भाविकांच्या पिशव्यांवर डल्ला मारताना दोन महिलांना पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.
पोलिसांकडून संशयितांची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांकडून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी टोळी सक्रिय आहे. या सक्रिय टोळीतील प्रत्येक सदस्यांची चोरीची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून 14 चोरीचे मोबाईल फोन आणि सात सोन साखळ्या जप्त केल्या.