सोनम मस्कर आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकली

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Nagpur's Sonam Maskar shines at the Asian Games कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्कर हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देण्यात सोनमने महत्त्वपूर्ण योगदान दिले. २० व्या आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.१० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारतीय संघाला मिळालेल्या एकूण १८९८.० गुणांपैकी सोनमने वैयक्तिक ६३४.१ गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
 
 

546567
 
सोनम सध्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून तिचे वडील महानंद वितरक सहकारी पतसंस्था येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सोनमने दिल्ली, कोल्हापूरसह मुंबईत कामगार क्रीडा भवनाच्या शुटिंग रेंजमध्ये देखील सराव केला आहे.मुंबई परिसरातील तसेच कामगार कुटुंबातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचवावे यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन निधीतून या रेंजची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या रायफल शुटिंग रेंजचे व्यवस्थापन केले जाते. आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उपसचिव रोशनी कदम पाटील, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे, उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी सोनम आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.