राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पूर्वाच्या वेगाला सुवर्णझळाळी!

उंचावला महाराष्ट्राचा झेंडा ः अंडर-१८ रिले संघातून सुवर्णपदकाची कमाई

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
national-athleticsतालुक्यातील अरततोंडीच्या मातीतून धाव घेतलेल्या पूर्वा जगदीश लोथे हिने आपल्या वेगाला मेहनत, जिद्द आणि सातत्याची जोड देत राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण भरारी घेतली आहे. गोवा येथे अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (­एएफआय)च्या वतीने आयोजित पश्चिमी क्षेत्रीय ज्युनिअर राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत पूर्वाने महाराष्ट्राच्या अंडर-१८ मुलींच्या रिले संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले.
 

lojj 
 
ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मोठे आव्हान मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पूर्वाने आपल्या कामगिरीची छाप उमटविली. महाराष्ट्राच्या रिले संघाचा भाग होत तिने मिळविलेल्या सुवर्ण यशामुळे अरततोंडी गावासह, अर्जुनी मोरगाव तालुका आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा गौरव झाला आहे. पूर्वाच्या या यशामागे तिची मेहनत, नियमित सराव आणि जिंकण्याची जिद्द आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर पोहोचत तिने अनेक होतकरू खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशामुळे अरततोंडी परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.