हुंड्यासाठी छळाचा २३ वर्षीय आयटी अभियंताची आत्महत्या

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
पुणे
vaishnavi jarande उंड्री परिसरातील वडाचीवाडी येथे हुंड्यासाठी झालेल्या कथित छळातून २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या वैष्णवी प्रवीण जरांडे हिचा विवाह झाल्यानंतर ती वर्क फ्रॉम होम करत होती. याच काळात सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.
 

pune dowry death case: 23-year-old it engineer vaishnavi jarande dies, husband and in-laws arrested 
वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च केल्याचे तसेच मुलीला दहा तोळे सोने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींकडून कार घेण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेच्या आदल्या vaishnavi jarande  रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या पतीचा तिच्या माहेरच्या व्यक्तींना फोन आला. ‘तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल,’ अशा आशयाचे वक्तव्य त्याने फोनवर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. हुंड्याची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीच्या आधारे काळेपडळ पोलिसांनी वैष्णवीच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वैष्णवी बंगळुरूतील  vaishnavi jarande  एका आयटी कंपनीत कार्यरत होती. विवाहानंतर तिने पुण्यातूनच वर्क फ्रॉम होम सुरू केले होते. मात्र, या काळात सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू असल्याचे तिच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. लग्नासाठी मोठा खर्च करून आणि सोन्याचे दागिने देऊनही कारसाठी अतिरिक्त हुंड्याची मागणी झाल्याने या प्रकरणाने पुन्हा एकदा हुंड्याच्या प्रथेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
पुण्यातील उंड्री परिसरातील या घटनेचा पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात असून, वैष्णवीच्या मृत्यूमागील परिस्थिती आणि तिच्या छळासंदर्भातील आरोपांची चौकशी सुरू आहे.