२० लाखांची लाच मागणारा महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
पुणे
acb  रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पुणे महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला डॉक्टरकडून ३० हजार रुपयांचा लाचेचा हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
 

pune news, pune crime news, pune pmc, pmc corruption, dr dnyaneshwar chakor, acb pune, acb trap, bribe case, corruption case, pune municipal corporation, vishrantwadi, dhanori, medical officer arrested, maharashtra crime news, pune latest news 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला डॉक्टर यांचे धानोरी, विश्रांतवाडी परिसरात खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील कथित अनियमिततेसंदर्भात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल झाला होता. या तक्रारीची चौकशी करण्याची जबाबदारी डॉ. चकोर यांच्यावर सोपवण्यात आली होती.
१८ सप्टेंबर रोजी डॉ. चकोर यांनी संबंधित रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी रुग्णालयात अनेक त्रुटी असल्याचे सांगत, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप आहे. ही कारवाई टाळायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही त्यांनी महिला डॉक्टरकडे केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर acb महिला डॉक्टरकडून डॉ. चकोर यांनी सुरुवातीला १५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतरही लाचेची मागणी सुरूच राहिली. उर्वरित रकमेपैकी ३० हजार रुपये शनिवारी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात घेऊन येण्यास त्यांनी महिला डॉक्टरला सांगितले. या प्रकाराला त्रासलेल्या डॉक्टरने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने शनिवारी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे महिला डॉक्टरकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. चकोर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्याविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पुणे महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.