नागपूर,
Pyramid Gold Society पिरॅमिड गोल्ड सोसायटी गणेशोत्सव मंडळाला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांनी महिला व बालकांशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही अडचण किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजय सोनटक्के तसेच सोसायटीतील कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.
सौजन्य:वीरेंद्र जोगी,संपर्क मित्र