समुद्रपूर,
Sayaji Shinde नव्याने उदयास आलेल्या गिरड-खुर्सापार जंगल सफारी प्रकल्पाला ज्येष्ठ मराठी अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या आग्रहास्तव नुकतीच भेट दिली. सुमारे तीन तास जंगल सफारी करत त्यांनी परिसरातील वनसंपदा, जैवविविधता, वन्यजीवांचा अधिवास आणि भौगोलिक वैशिष्ट्यांंची माहिती घेतली. निसर्गाच्या सान्निध्यात सफारीचा आनंद घेत त्यांनी समाधान व्यत केले.
सफारीदरम्यान गिरड परिसरातील जंगल क्षेत्र, शेती व्यवस्था, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वन्यजीव संवर्धनाच्या विविध पैलूंवरही चर्चा झाली. जंगलातील बारकावे जाणून घेताना शिंदे यांनी येथील नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेतला. सफारीनंतर वनविभागाच्या विश्रामगृहात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे, ठाणेदार विकास गायकवाड व वनविभागाच्या कर्मचार्यांनी सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. समुद्रपूर तालुयातील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त मोहगावचे माजी सरपंच विलास नवघरे, पत्रकार गजानन गारघाटे, राकेश बोबडे, राहुल गाठे, प्रशांत ठाकूर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे उपस्थित होते. गिरड जंगल सफारी प्रकल्पामुळे परिसरातील जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक पर्यटनाला नवी ओळख मिळण्याची शयता आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या भेटीमुळे या नव्याने विकसित होत असलेल्या जंगल सफारीकडे लक्ष वेधले गेले आहे. आमदार समीर कुणावार, उपवनसंरक्षक हरविर सिंग, सहाय्यक वनसरक्षक हरीष सरोदे, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांचे हा प्रकल्प उभारण्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे.
गिरडच्या जंगलात ताडोबापेक्षाही वेगळा आनंद : सयाजी शिंदे
अनेक व्याघ्र सफारींना भेट दिली, मात्र गिरड-खुर्सापारसारखी नैसर्गिक विविधता कुठेही पाहायला मिळाली नाही. गिरडच्या जंगल सफारीदरम्यान जो आनंद मिळाला तो ताडोबापेक्षाही वेगळा होता. जंगलातील तलाव, नाले आणि गवताळ प्रदेश मनाला भावले. हा प्रकल्प आधीच सुरू व्हायला हवा होता. सफारी सुरू झाल्यानंतर येथे पुन्हा नकी येईल. गिरड सफारी लवकरच महाराष्ट्रात मोठे नाव करेल, असा विश्वास अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यत केला.