संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे राजकारण थांबवा

काँग्रेसच्या आरोपांवर आ. अग्रवाल यांचा पलटवार

    दिनांक :28-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
Vinod Agrawalएसआयआर, मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरून काँग्रेस व विरोधकांकडून संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचे राजकारण थांबवावे, असा पलटवार आमदार विनोद अग्रवाल यांनी केला. सोमवारी २८ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली.
 
 
vinod
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयासह संवैधानिक संस्थांच्या कार्यप्रणालीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून केले जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. राजकीय मतभेद अथवा निवडणुकीतील पराभवाचा आधार घेऊन संवैधानिक संस्थांना कटघर्‍यात उभे करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. तथ्यांच्या आधारे प्रश्न उपस्थित करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे.
 
 
मात्र, कोणताही ठोस पुरावा नसताना आरोप करणे योग्य नाही, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाच्या संयुक्त बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, एसआयआरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आयोगाने सर्वसंमतीने घेतले आहेत. तसेच २६ सप्टेंबरच्या बैठकीतील निर्णयांना आयोगाची मंजुरी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात गंभीर मतभेद असल्याचे दावे तथ्य म्हणून मांडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.