भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या व ३ पिल्ले मृत्यूमुखी

पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड,
dog attack कारंजा येथील बिलाल नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जुम्मा रेघीवाले यांच्या ११ बकर्‍या आणि ३ बकरीची पिल्ले मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
 
dog attack
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी बकर्‍यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ११ बकर्‍या तसेच ३ बकरीची पिल्ले मृत्युमुखी पडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. पशुपालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबास या नुकसानीचा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानाचे योग्य मूल्यांकन करून शासनाच्या नियमानुसार जुम्मा रेघीवाले यांना आर्थिक मदत अथवा नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बिलाल नगरसह शहरातील विविध भागामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यांवर फिरणार्‍या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार तसेच पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.dog attack भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे पशुधनाचे नुकसान होण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी. तसेच कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नियमांनुसार आवश्यक कारवाई करण्याची मागणी होत आहे.