पदकांचा ‘पंच’ भारताची पदकांची ‘हाफ सेंच्युरी’कडे वाटचाल

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
नागोया
asian games आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने पदकांच्या शर्यतीत दमदार सुरुवात केली. महिलांच्या ट्रॅप शूटिंग सांघिक स्पर्धेत नीरू, आशीमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर वैयक्तिक ट्रॅप शूटिंगच्या अंतिम फेरीत नीरूने प्रभावी कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे भारताच्या खात्यात आता पाच सुवर्णांसह एकूण ४७ पदके जमा झाली आहेत.
 

asian games 2026 india reaches 47 medals with 5 gold, eyes 50-medal milestone 
पुरुषांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेतही भारताकडून पदकाची अपेक्षा आहे. भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तिरंदाजीतही भारताने विजयाने दिवसाची सुरुवात केली. सोमवारअखेर भारताच्या नावावर ४५ पदके होती. आज पदकसंख्या ५० च्या पुढे नेण्याचे भारतीय खेळाडूंचे लक्ष्य असेल. बॉक्सिंग, अॅथलेटिक्स आणि नेमबाजीमध्ये अनेक पदकांच्या लढती होणार आहेत. दहाव्या दिवशी भारतीय खेळाडू तब्बल १३ क्रीडा प्रकारांत आपले आव्हान सादर करणार आहेत.
तिरंदाजीत पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक एलिमिनेशन फेरीत धीरज बोम्मादेवरा आणि नीरज चौहान सकाळी ५.३० वाजता मैदानात उतरतील. महिला रिकर्व्ह वैयक्तिक स्पर्धेत कीर्ती आणि कुमकुम मोहोद यांची सकाळी ९.४५ वाजता लढत होईल.
बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत परवीनचा सामना चीनच्या ली शूशी सकाळी १०.१५ वाजता होणार आहे. पुरुषांच्या ८० किलो गटात अंकुश पांघालची सकाळी ११ वाजता उझबेकिस्तानच्या फजलिद्दीन एरकिनबोएवशी, तर ९० किलो गटात नरेंद्रची सकाळी ११.३० वाजता कझाकिस्तानच्या आइबेक ओरलबेशी गाठ पडेल. या तिन्ही लढती पदकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
कॅनो स्लॅलममध्ये पुरुषांच्या कयाक सिंगल हीट्समध्ये हितेश केवट आणि प्रद्युम्न सिंह राठौड़ सकाळी ७ वाजल्यापासून सहभागी होतील. त्याच वेळी महिलांच्या कॅनो सिंगलमध्ये पल्लवी जगताप आणि रीना सेन, तर महिलांच्या कयाक सिंगलमध्ये शिखा चौहान आपले आव्हान सादर करतील. कुराशच्या पुरुषांच्या ६६ किलो गटात विपिन कुमार सकाळी ६.२४ वाजता उपउपांत्यपूर्व फेरीत खेळेल. विजयाची मालिका कायम राहिल्यास त्याला पुढे उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि पदकासाठीच्या लढतीत सहभागी होता येईल.
सेलिंगमध्ये पुरुषांच्या डिंगी asian games प्रकारातील पात्रता मालिकेच्या तिसऱ्या शर्यतीत विष्णु सरवनन सकाळी १० वाजता सहभागी होणार आहे. नेमबाजीत पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक पात्रता आणि सांघिक अंतिम फेरीत शपथ भारद्वाज, कायन चेनाई आणि अहवर रिजवी सकाळी ६.३० वाजता निशाणा साधतील. महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक पात्रता आणि सांघिक अंतिम फेरीच्या तिसऱ्या दिवशी नीरू, मनीषा कीर आणि आशीमा अहलावत यांचीही सकाळी ६.३० वाजता स्पर्धा होईल. पात्रता मिळाल्यास महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक अंतिम फेरीत याच तिघींची सकाळी १०.३० वाजता लढत होईल. पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास शपथ भारद्वाज, कायन चेनाई आणि अहवर रिजवी दुपारी १२ वाजता पदकासाठी मैदानात उतरतील.
स्क्वॅशच्या महिला सांघिक गटात भारताचा सामना इराणशी सकाळी ६.३० वाजता होणार आहे. सर्फिंगमध्ये पुरुषांच्या शॉर्टबोर्ड उपांत्यपूर्व फेरीत किशोर कुमार अंबारासुची फिलिपिन्सच्या टोबी एस्पेजोनशी पहाटे ४.५४ वाजता लढत होईल.
 
 
टेनिसमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत asian games दक्षिणेश्वर सुरेशचा सामना इंडोनेशियाच्या गुनावन ट्रिस्मुवंताराशी सकाळी ६.३० वाजता, तर सुमित नागलचा सामना दक्षिण कोरियाच्या होंग सियोंग-चानशी सकाळी ९ वाजता होणार आहे. पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत युकी भांबरी-दक्षिणेश्वर सुरेश यांची जोडी कझाकिस्तानच्या डेनिस येवसेयेव- बेइबित झुकायेव जोडीशी सकाळी ९ वाजता खेळेल. त्याच वेळी अनिरुद्ध चंद्रशेखर-एन. श्रीराम बालाजी यांची जोडी नेपाळच्या अभिषेक बास्तोला-प्रदीप खड़का यांच्याशी भिडेल. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत अंकिता रैना-एन. श्रीराम बालाजी जोडीचा सामना हाँगकाँगच्या यूडिस चोंग-कायरन थॉम्पसन जोडीशी दुपारी १२ वाजता होणार आहे.
ट्रॅक सायकलिंगमध्ये महिलांच्या टीम स्प्रिंटमध्ये सेलेस्टिना, सरिता कुमारी, कीर्ती रंगास्वामी चिक्का आणि त्रियाशा पॉल सकाळी ६.३० वाजल्यापासून पात्रता, हीट आणि पदकाच्या शर्यतीत सहभागी होतील. पुरुषांच्या टीम स्प्रिंटमध्ये रोजित सिंह, डेव्हिड बेकहम, रोनाल्डो सिंह आणि जेमश सिंह यांची सकाळी ६.४८ वाजता स्पर्धा सुरू होईल. महिलांच्या टीम परस्यूटमध्ये हर्षिता जाखड़, पूजा डानोले, मीनाक्षी आणि स्वोस्ती सिंह सकाळी ७.१२ वाजता ट्रॅकवर उतरतील.
 
 

व्हॉलीबॉलच्या पूल ‘सी’मध्ये भारताचा सामना कतारशी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
 
 
अॅथलेटिक्समध्ये भारताला पदकांच्या अनेक संधी आहेत. पुरुषांच्या पोल वॉल्ट अंतिम फेरीत देव कुमार मीणा आणि कुलदीप कुमार दुपारी २.५० वाजता सहभागी होतील. महिलांच्या हाय जंपमध्ये पूजा आणि सुप्रिया बसवराजू यांची अंतिम फेरी दुपारी ३.३५ वाजता होईल. महिलांच्या हॅमर थ्रोमध्ये अनुष्का यादव आणि तान्या चौधरी संध्याकाळी ४.०५ वाजता पदकासाठी प्रयत्न करतील. महिलांच्या ८०० मीटर अंतिम फेरीत गौतमी जयरामन आणि पूजा यांची संध्याकाळी ४.२० वाजता शर्यत होईल. पुरुषांच्या ८०० मीटर अंतिम फेरीत मोहम्मद अफसल संध्याकाळी ४.३५ वाजता धावेल.
पुरुषांच्या ५००० मीटर अंतिम फेरीत गुलवीर सिंह आणि अविनाश साबळे संध्याकाळी ४.४५ वाजता पदकासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर मिश्र ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये भारताची अंतिम फेरी संध्याकाळी ५.१८ वाजता, महिलांची ४ बाय ४०० मीटर रिले संध्याकाळी ५.३५ वाजता, तर पुरुषांची ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम फेरी संध्याकाळी ५.४७ वाजता होणार आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडण्याची शक्यता असून, ५० पदकांचा टप्पा गाठण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.