सेलू,
biker-killed-in-car-collision तालुयातील जुनगड चौक परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २९ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. एकनाथ नामदेव सावरकर (२६) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथा हा एम. एच. ४० ए. व्ही. ७७५६ क्रमांकाच्या दुचाकीने कान्होली बारा येथून जुनगडच्या दिशेने जात होता.
दुचाकी जुनगड परिसरात आली असता भरधाव एम. एच. ४७ यू. ५४५६ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. यात एकनाथ हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीस तातडीने येथील रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे.