विश्वास, सुहृदयता ध्येयामुळेच बुलडाणा अर्बनची जगभर ख्याती : राधेश्याम चांडक

बुलडाणा अर्बनची ४० वी आमसभा

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
बुलडाणा
buldana-urban चार दशकांपूर्वी सुरू झालेला बुलडाणा अर्बनचा प्रवास आज वटवृक्षामध्ये रूपांतरीत झालेला आहे. अनेक चढउतार आले. मात्र ग्राहकांचा विश्वास, संचालक, कर्मचार्‍यांची सुहृदयता आणि लोकउत्थान साधने हेच अंतिम ध्येय असल्याने आज बुलडाणा अर्बनची ख्याती जगभरामध्ये पोहोचल्याचे गौरवोदगार संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.
 

chandak
बुलडाणा अर्बन संस्थेच्या ४० वी आमसभा स्थानिक सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा येथे संपन्न झाली. सर्व प्रथम भारतमातेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, संस्थेचे उपाध्यक्ष विनोद केडिया, जेष्ठ संचालक कांतीलाल छाजेड,संचालक विनोद भंडारी, नंदकिशोर झंवर,डॉ किशोर केला,गोपाल चिरानिया,नंदकिशोर बाहेती, दिनेश गांधी, मंजुबाई गाडगे, यांच्या सह बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार विद्या मंदिरच्या बॅण्ड पथकने राष्ट्रगान सादर केले. वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शांतीपाठ म्हटला. सभेच्या प्रारंभी मागील वर्षात निधन झालेले कर्मचारी, सभासद आणि देशातील नामवंत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर यांनी सांगितले की, बुलडाणा अर्बन संस्थेच्या यशस्वी ४० वर्षांच्या यशात सभासदांचा सिंहाचा वाटा आहे. सभासदांनी जो विश्वास बुलडाणा अर्बन संस्थेवर ठेवला, संस्थेने देखील त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. संस्थेकडून सभासदांना यावर्षी ११ % लाभांश वाटप करण्यात येणार आहे. तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक कांतीलाल छाजेड यांचा सत्कार करण्यात आला. विषय सुचीचे वाचन रविंद्र कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या सह सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.