गडचिरोली,
cooperate-for-the-credit-societys-progress दंडकारण्य पतसंस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले हे बघताना गो. ना. मुनघाटे यांना निश्चितच आनंद झाला असता पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. प्राचार्य वंदना मुनघाटे यांनी केले. दंडकारण्य पतसंस्थेची 31 वी आमसभा स्थानिक विद्याभारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली येथे दंडकारण्य संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नामदेवराव बानबले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. वंदना मुनघाटे बोलत होत्या. यावेळी प्राचार्य सुमा लडके, पतसंस्थेचे अध्यक्ष यादव बाणबले, उपाध्यक्ष प्रा. गोरटेकर, सचिव सतीश मुनघाटे, सदस्य डॉ. संजय महाजन आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी अर्णव रवींद्र विखार, श्रेया गेडाम, वेदांत चुधरी, गीतांजली चुधरी, सेवानिवृत्त सभासद अशोक काचीनवार, प्रा. वाढनकर, देशमुख, रत्नाकर वासेकर, प्रा. उईके, प्रकाश चुधरी, विनायक मुनघाटे, पांडुरंग उईके, मांडवे आदींचा सत्कार करण्यात आला.