तळप बु ग्रापं मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी अन्नत्याग आंदोलन

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
मानोरा,
hunger-strike तालुयातील तळप बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षांत झालेल्या विकासकामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
 
 
hunger-strike
 
२०२१-२२ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून २.९९ हजार रुपये किमतीचा मंजूर झालेला आर ओ प्लांट बसविण्यात आला नसून, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले नाही. तळप बु. येथे ७ लाख रुपयांचे क्रीडांगण मंजूर झाले होते, परंतु थातूरमातूर काम करून संपूर्ण निधी लाटण्यात आला. नियमानुसारग्रामपंचायतीला दरवर्षी अपंगावर ५ टक्के निधी खर्च करावा लागतो, मात्र, गत ५ वर्षांत ग्रामपंचायतीने एकही रुपया खर्च केला नाही. दलित वस्ती निधीतून केलेला रस्ता एका वर्षातच उखडला असून, नाली बांधकाम आणि रपट्यांचे बोगस काम दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला.
 
 
१५ व्यावित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रावर लाखो रुपये खर्च दाखवला, परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही.सामान्य फंडात जमा झालेला लाखो रुपयांचा निधी थातूरमातूर कामे करून काढण्यात आला असून, गत ५ वर्षांत ग्रामसभेने जमा-खर्चाचा हिशोब दिलेला नाही.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्यती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीआहे. त्यामुळे २८ सप्टेबर पासुन बंडू महादेव इंगोले, अनिल गायकवाड, सदानंद इंगोले आणि पवन वानखेडे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.