वैभवला चॅलेंज देतोय इंडियाचा नवा स्टार!

डबल सेंच्युरी, सेंच्युरी आता पुन्हा डबल सेंच्युरी... 3 मॅचमध्ये 517 नॉट आऊट

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
cricket-star आयपीएल 2026 मध्ये विक्रमी रन केल्यानंतर वैभवची भारताच्या टी-20 टीममध्ये निवड झाली, यानंतर वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केलं. याचसोबत वैभवने सचिनचा सगळ्यात लहान वयात भारताकडून पदार्पण करण्याचा विक्रम मोडला. एकीकडे वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरू असतानाच भारताच्याच आणखी एका युवा क्रिकेटपटूने इतिहास घडवला आहे. अंडर-19 क्रिकेटमध्ये खेळताना त्याने दोन युथ टेस्टमध्ये द्विशतकं ठोकली. युथ टेस्टमध्ये दोन द्विशतकं ठोकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू आहे.
 
raichandani
अंडर-19 क्रिकेटमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली युथ टेस्ट मॅच खेळत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 430/8 एवढा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमध्ये फक्त 217 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताकडे 213 रनची आघाडी आहे. भारताकडून लक्ष्य रायचंदानी 256 बॉलमध्ये 210 रनवर नाबाद खेळत आहे, लक्ष्यने त्याच्या इनिंगमध्ये 20 फोर आणि 4 सिक्स मारल्या, तसंच त्याने 82.03 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. लक्ष्यने त्याचं द्विशतक फोर मारून केलं. भारताकडून लक्ष्य रायचंदानी 256 बॉलमध्ये 210 रनवर नाबाद खेळत आहे, लक्ष्यने त्याच्या इनिंगमध्ये 20 फोर आणि 4 सिक्स मारल्या, तसंच त्याने 82.03 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. लक्ष्यने त्याचं द्विशतक फोर मारून केलं.
श्रीलंका दौऱ्यापासून लक्ष्य धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेतल्या कठीण खेळपट्ट्यांवर त्याने 3 इनिंगमध्ये 2 शानदार शतकं ठोकली, ज्यात एका द्विशतकाचाही समावेश होता. मागच्या 4 टेस्ट इनिंगमध्ये लक्ष्यच्या नावावर 3 शतकं आहेत. श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या यूथ टेस्टमध्ये लक्ष्य रायचंदानीने 207 रन केले, यानंतर दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने नाबाद 100 रनची खेळी केली आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो डबल सेंच्युरी करून नाबाद खेळत आहे. मागच्या 3 सामन्यांमध्ये लक्ष्यच्या 517 धावा झाल्या आहेत.