शासकीय रुग्णालयाच्या परिसरात अवैध वृक्षतोड

नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
llegal-tree-felling येथील शासकीय  वैद्यकीय  महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात नविन शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे बांधकाम सुरू असून, त्या ठिकाणी असलेले बांबू, झुडपे तसेच कडुनिंब व सागवानचे वृक्ष विनापरवानगी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचा आरोप एमईएल प्रभाग क्रमांक 3 चे नरसेवक नितेश गवळे यांच्यावर आहे. त्यांच्याविरुद्ध महानगरपालिकेत तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिकेने पोलिस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
 
tree cutting
मागील 17 वर्षांपासून उभे असलेले कडुलिंबाचे झाड व 37 वर्षांपासून सावली देणारे सागवान वृक्ष अवैधरित्या तोडल्याची तक्रार 8 जुलै 2026 रोजी महानगरपालिकेकडे प्राप्त झाली होती. 10 जुलै 2026 रोजी संबंधित वृक्षतोडीसंदर्भात पंचनामा केला असता, प्रत्यक्ष साक्षीदारांनी वृक्षतोड झाल्याची माहिती दिली. याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभागाच्या कंत्राटदाराकडून सदर वृक्षतोड कोणत्या कारणास्तव व कोणाच्या परवानगीने करण्यात आली याबाबतचा खुलासा मागितला. मात्र, त्यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा आरोप आहे.
 
तसेच, रामनगर पोलिस ठाणे येथे संबंधित नगरसेवकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविले असता, ते स्वीकारले नसल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तक्रारदाराकडून मनपा कार्यालयाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत असून, विनापरवानगी वृक्ष तोडण्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा तसेच, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (आदिवासी विभाग) व संबंधित कंत्राटदार यांच्यावर देखील महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनीयम, 1975 च्या कलम 21 (2) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महानगरपालिकेने पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे.