कारच्या धडकेत ४ वर्षांचा चिमुकला गंभीर

महिला चालकाविरुद्ध गुन्हा, कार जप्त

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur accident घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावरील शिक्षक कॉलनीत घडली. शिवांश सचिन देशमुख (४) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी महिला कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कार जप्त केली आहे.
 

nagpur accident news, nagpur road accident, 4 year old boy injured, bharatwada road accident, teacher colony nagpur, kalamna police, nagpur police news, child hit by car, woman driver booked, car accident nagpur, cctv accident footage, nagpur crime news, maharashtra accident news, road safety nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरच्या सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शिवांश घरासमोर खेळत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या कारने त्याला धडक दिली. महिला चालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप आहे. कारची धडक बसताच शिवांश रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्यासह शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात कारची धडक आणि त्यानंतरचा घटनाक्रम दिसत असल्याचे सांगण्यात येते. अपघातानंतर महिला चालक कारसह तेथून पसार झाली. घटनेनंतर शिवांशचे वडील सचिन हरिभाऊ देशमुख हे स्थानिक नागरिकांसह कळमना पोलिस ठाण्यात पोहोचले. महिला चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत त्यांनी पोलिसांकडे दाद मागितली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कळमना पोलिसांनी महिला कारचालकाविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. अपघातातील कारही पोलिसांनी जप्त केली.