पोलिस कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

विद्यार्थिनी गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघडकीस : प्र. ठाणेदाराची माहिती देण्यास टाळाटाळ

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur police खाकी वर्दीतील व्यक्ती दिसला की मनातील भीती निघून जाऊन रक्षणकर्ता असल्याची भावना निर्माण होते. मात्र, हा रक्षकच भक्षक बनून लैंगिक शोषण करीत असेल तर विश्वास उडून जनमानसात पोलिस विभागाची प्रतिमा मलिन होते. नागपूर पोलिस आयुक्तालयात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याने बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला घरी नेऊन बळजबरी लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रतीक विनोद धरपाल (२५, महेशनगर, बोरगाव रोड, गिट्टीखदान) असे बलात्कार करणाऱ्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मात्र, या घटनेबाबत प्रभारी पोलिस निरीक्षक देवानंद नरोटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न तर अधिकारी करीत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

nagpur police  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक धरपाल हा पोलिस दलात क्युआरटी विभागात कार्यरत आहे. प्रतिकची २०२२ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली होती. ती बाराव्या वर्गात शिकत आहे. इंस्टावर बोलताना त्याने मोबाईल क्रमांक मागितला. व्हॉट्सअपवर काही दिवस बोलल्यानंतर थेट भेटीसाठी त्याने आग्रह धरला. तिने पोलिस कर्मचारी असल्यामुळे मोठ्या विश्वासाने भेट घेतली. त्यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्यानंतर प्रतीकने १७ ऑगस्ट रोजी तिला वाढदिवस असल्याचे सांगून स्वत:च्या घरी बोलावले. ओळखीचा असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस असल्यामुळे ती विद्यार्थिनी त्याच्या गिट्टीखदान, महेशनगरातील घरी भेटायला गेली. त्याने वाढदिवसाच्या नावावर तिला घरात एकटी असल्याचे बघून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला दमदाटी व धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिस कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्यामुळे आता पोलिसांकडेच तक्रार केल्यास न्याय मिळणार नाही, म्हणून तिने वाच्यता केली नाही.


अशी आली घटना उघडकीस
विद्यार्थिनी २२ सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये गेली होती. वर्गात शिक्षक शिकवत असतानाच तिला अचानक चक्कर आली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्या पालकांनाही बोलावून घेतले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे सांगितले. पालकांसह शिक्षकांना धक्का बसला. त्यानंतर तिने पोलिस कर्मचारी प्रतिक धरपाल याने घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. पालकांनी लगेच गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी प्रतिकवर गुन्हा दाखल केला.