तरुणीचा पाठलाग करून अश्लील हावभाव

घटनेचा व्हीडिओ व्हायरल; पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur viral video बुलेटस्वार तरुणीचा दुचाकीने पाठलाग करून अश्लील हावभाव केल्याच्या आरोपावरून इमामवाडा पोलिसांनी ३ युवकांना ताब्यात घेतले. या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत तिघांचा शोध घेतला. गौरव पुरुषोत्तम दांडे, प्रणय ऊर्फ गोलू दत्ताराम कलकर आणि धीरज भनारकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील वाहनेही जप्त केली आहेत.
 

nagpur viral video three youths detained for allegedly following woman and making obscene gestures 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी बुलेटवरून बैद्यनाथ चौकातून नवीन उड्डाणपुलाच्या दिशेने जात होती. यावेळी एका दुचाकीवरून जाणाऱ्या तीन युवकांनी तिचा पाठलाग केला. पाठलाग करताना त्यांनी तरुणीकडे पाहात अश्लील हावभाव केले. तरुणीने विरोध करीत तिघांनाही चांगलेच फटकारले. या घटनेची चित्रफीत नंतर समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. ती पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी तिघांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकारात वापरण्यात आल्याचे सांगितले जाणारे वाहनही जप्त केले आहे. घटनेची अधिक चौकशी सुरू असून, तपासानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.