हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलसोबत झालेल्या भेटीचा भन्नाट किस्सा

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
मुंबई
pushkar jog मराठी अभिनेता पुष्कर जोग आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. ‘जबरदस्त’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुष्करने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलसोबत झालेल्या भेटीचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
 

pushkar jog on vin diesel: marathi actor says he would have offered him jabardast 2 
‘द मराठी फाऊंडर’ला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर जोगने विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने व्हिन डिझेलसोबत झालेल्या भेटीची आठवण सांगताना, त्याला आपल्या आगामी मराठी चित्रपटाची ऑफर देण्याची इच्छा होती, असे म्हटले.पुष्करच्या म्हणण्यानुसार, एका प्रसंगी व्हिन डिझेल त्याच्यासमोर उभा होता. मात्र, अभिनेत्याभोवती पापाराझी आणि चाहत्यांची मोठी गर्दी असल्याने त्याला अधिक वेळ घेणे योग्य वाटले नाही. तरीही त्याने व्हिन डिझेलची भेट घेत स्वतःची ओळख भारतीय फिल्ममेकर म्हणून करून दिली.या भेटीदरम्यान व्हिन डिझेलने भारतात चित्रपट कशा पद्धतीने तयार होतात आणि येथील सिनेमांचा कंटेंट कसा असतो, अशी विचारणा केल्याचे पुष्करने सांगितले. त्यावर आपल्याकडील कंटेंट खूप चांगला असल्याचे त्याने व्हिन डिझेलला सांगितलेpushkar jog  पुष्करने पुढे सांगितले की, व्हिन डिझेलसोबत त्याला 15 ते 20 मिनिटे शांतपणे बोलण्याची संधी मिळाली असती, तर त्याने नक्कीच त्याला मराठी चित्रपटाची ऑफर दिली असती. विशेष म्हणजे, या भेटीत व्हिन डिझेलला ‘जबरदस्त 2’मध्ये काम करण्याची ऑफर देण्याचा त्याचा विचार होता.
हॉलिवूडमधील कलाकार अतिशय नम्र असतात, असेही पुष्करने या मुलाखतीत नमूद केले. मात्र, भेटीच्या ठिकाणी असलेली गर्दी आणि मर्यादित वेळेमुळे व्हिन डिझेलसोबत अपेक्षेप्रमाणे संवाद साधता आला नाही. त्यामुळे ‘जबरदस्त 2’ची ऑफर देण्याची संधी मात्र हुकल्याचे त्याने मिश्कीलपणे सांगितले.