आता अनेक रहस्य उलगडणार, तुरूंगाबाहेर येणार सचिन वाझे

साडे पाच वर्षानंतर जामीन मंजूर

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
मुंबई
sachin vaze अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे वर्षांनंतर ते तुरूंगाबाहेर येणार आहेत.
 
sachin waze
अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग, खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांना याच प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरूंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर मुंबईतील सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेंना जामीन मंजूर करण्यात आला. दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयाने अधोरेखित केला. जामीन मंजूर झाल्यानंतर सचिन वाझे यांच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.