बुलढाणा
shiv-sena-ubt-stages-protest संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा सर्व बाधित शेतकर्यांना सरसकट हेटरी १ लाख रुपयांची तातडीने मदत मिळावी पिकविमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा व्हावा यासह इतर मागण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दि. २९ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या आक्रोश मोर्चामध्ये जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आ. सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना पक्ष प्रवक्त्या जयश्री शेळके, अॅड.सुमित सरदार,जिल्हा संघटक गोपाल बचीरे,जिल्हा समन्वयक गजानन धांडे, सागरताई पुरी हे उपस्थित होते. यंदाच्या कडक परिस्थितीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. शासनाच्या उदासीनतेविरोधात आणि शेतकर्यांच्या हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. आमच्या प्रमुख मागण्या संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा सर्व बाधित शेतकर्यांना सरसकट हेटरी १ लाख रुपयांची तातडीने मदत मिळावी, पिकविमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा व्हावा. याप्रसंगी नगराध्यक्ष किशोर गारोळे,युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे,महिला संघटिका सह संपर्कप्रमुख उर्मिला ठाकरे,महिला संघटिका विजया खडासन, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, लखन गाडेकर,बद्री बोडके, विलास सुडकर समस्त पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.