नागपूर
Baljagat Laxminagar दीनदयाल शोध संस्थान, बालजगत, लक्ष्मीनगरतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उद्देशाने ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे मानकरी शरद कोकाटे शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या सात मिनिटांत मूर्ती साकारण्याचे प्रात्यक्षिक ते दाखवणार आहेत. मुलांसह पालकांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य निकिता लुटे,संपर्क मित्र