अमरावतीत भर चौकात महाविद्यालयीन तरुणीची हत्या

युवकाने केले चाकूने वार

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अमरावती,
Murdered रवी नगर चौकात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची माथेफिरू तरुणाने भरदिवसा निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहररात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.


Murdered  
माथेफिरू तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थी शर्वरी हिच्यावर चाकूने सपासप वार केले. ​रवी नगर येथील गजबजलेल्या चौकात घडलेल्या या थरारक घटनेने नागरिक हादरले आहे. आरोपी गेल्या दोन वर्षांपासून मृतक तरुणीला ओळखत होता. गुरुवारी दुपारी शर्वरी आपल्या दुचाकीने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात जात असताना, मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या नराधम आरोपीने तिचा पाठलाग केला. रवी नगर चौकात त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने शर्वरीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर वार केले. जिवाच्या आकांताने प्राण वाचवण्यासाठी तिने निकराचा प्रतिकार केला. दरम्यान झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळीच पडले. मात्र, निर्दयी हल्लेखोराने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडून घटनास्थळावरून पोबारा केला.
​घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्याम घुगे, राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, गुन्हे शाखाप्रमुख अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राजापेठ पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.