ट्रम्प यांचा फोटो असलेले १ डॉलरचे नाणे बाजारात

अमेरिकेत राजकीय आणि कायदेशीर वादाला तोंड फुटले

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन
donald trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असलेले एक डॉलरचे नाणे बाजारात दाखल होताच अमेरिकेत त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नाण्यामुळे आता राजकीय तसेच कायदेशीर वादालाही सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या चलनावर आतापर्यंत कोणत्याही हयात राष्ट्राध्यक्षाचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. अमेरिकेच्या चलनव्यवस्थेत ही दीर्घकाळापासूनची परंपरा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा फोटो असलेले हे नाणे नेमके कोणी जारी केले आणि ते कायदेशीरदृष्ट्या वैध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

donald trump $1 coin launched by us mint: why the coin is sparking controversy 
अमेरिकेची टांकसाळ असलेल्या यूएस मिंटने बुधवारी ट्रम्प यांचा फोटो असलेले सोनेरी रंगाचे एक डॉलरचे नाणे बाजारात आणले. अमेरिकेच्या २५०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे विशेष नाणे जारी करण्यात आले आहे. यंदा अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष नाण्याच्या दर्शनी भागावर डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र साकारण्यात आले आहे. त्यासोबत ‘LIBERTY’, ‘IN GOD WE TRUST’ आणि ‘1776~2026’ असे शब्द आणि अंक नमूद करण्यात आले आहेत.
नाण्याच्या मागील बाजूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अधिकृत मोहोर असलेली विशेष रचना करण्यात आली आहे. या डिझाइनमधील ढालीवर ‘250’ हा अंक नमूद करण्यात आला आहे. अमेरिकेची ओळख, गौरव आणि वारसा यांचे प्रतीक म्हणून हे नाणे जारी करण्यात आल्याचे यूएस मिंटकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ट्रम्प यांचे छायाचित्र असलेल्या या नाण्यामुळे अमेरिकेत आता राजकीय आणि कायदेशीर चर्चेला उधाण आले आहे.
अमेरिकेत सरकारी मुद्रा आणि चलनावर हयात व्यक्तीचे छायाचित्र छापण्यासंदर्भात जुने नियम अस्तित्वात आहेत. या नियमांची सुरुवात १८६६ मध्ये झाली. त्यावेळी एका सरकारी अधिकाऱ्याने कथितपणे अमेरिकेच्या चलनावर स्वतःचे छायाचित्र छापून घेतल्याची घटना समोर आल्यानंतर काँग्रेसने यासंदर्भात नियम केला होता. हा नियम सामान्यपणे ‘Thayer Amendment’ म्हणून ओळखला जातो. त्यानुसार अमेरिकन नोटांवर कोणत्याही हयात व्यक्तीचे चित्र छापण्यास मनाई आहे. मात्र, हा नियम नाण्यांना लागू होत नाही.अमेरिकेच्या संघीय कायद्यानुसार, अमेरिकेच्या चलनावर तसेच सरकारी सिक्युरिटीजवर मृत व्यक्तींचीच छायाचित्रे असावीत, अशी तरतूद आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी या नियमांमध्ये बदल करण्यासाठी कायदा आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, संबंधित प्रस्ताव अद्याप पुढे जाऊ शकलेला नाही.दरम्यान, ट्रम्प यांचा फोटो असलेले एक डॉलरचे हे नाणे सध्याच्या कायद्यानुसार बेकायदेशीर मानले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामागे २०२० मध्ये मंजूर करण्यात आलेल्या एका कायद्याचा आधार आहे. ‘सर्क्युलेशन कलेक्शन कॉइन डिझाइन अॅक्ट ऑफ २०२६’ (CCRA) या कायद्यानुसार अमेरिकेच्या २५०व्या वर्धापन