हिंगणघाट,
dr mukul gharote मूळचे हिंगणघाटचे व हल्ली नाशिकचे वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुकुल अरविंद घरोटे यांची युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी (एडचज) आयोजित स्तनाच्या कॅन्सरवर अचूक उपचार क्रमनिर्धारण या प्रगत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ही निवड अर्ज व डॉटरांची या विषयावर प्रस्तुत शोध प्रबंध या मूल्यमापनावर आधारित निवड प्रक्रियेतून झाली आहे.
हा प्रगत अभ्यासक्रम सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रुग्णाच्या ट्यूमरची जैविक वैशिष्ट्ये, बायोमार्कर्स, पूर्वी घेतलेले उपचार, उपचाराला निर्माण होणारा प्रतिकार आणि उपलब्ध उपचार यांच्या आधारे कोणता उपचार केव्हा आणि कोणत्या क्रमाने द्यावा यावर या अभ्यासक्रमामध्ये विशेष भर दिला जाणार आहे. डॉ. घरोटे यांना अचूक उपचार पद्धती आणि वैद्यकीय संशोधनात विशेष रस असून त्यांच्या संशोधनामध्ये सी डी के इन्हिबिटर्स आणि विशिष्ट वेळेनुसार उपचार पद्धतींचा समावेश आहे.dr mukul gharote त्यांच्या प्रकाशित संशोधनात या पद्धतीचा वापरामुळे होणार्या हेमाटोलॉजिकल दुष्परिणाम संदर्भातील वास्तविक जगात या पद्धती चा अनुभवाचाही समावेश आहे.