सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप!

अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
गडचिरोली,
Earthquake in Sironcha Taluka गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे.अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
 
 
Earthquake in Sironcha Taluka
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.  नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.